भक्ती आणि शक्तीने आपल्या गावात शिव शक्ती नांदेल : प्रा. सुनिल देवरे
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
आपल्या गावात शिवशाही नांदते असे आपण तेव्हाच बोलू शकतो कि संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या भक्तीचा व राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तीचा संगम घडून आणू शकतो तेव्हाच खऱ्या अर्थाने गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो त्याच बरोबर गावातील युवा पिढी आणि जेष्ठ माणसं एकत्रित एका विचारला येतात प्रत्येक कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतात तेव्हाच गावात शिवशक्ती नांदते असे प्रतिपादन रोहा आमडोशी येथील भक्ती आणि शक्ती महोत्सवात आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते प्राध्यपक शिवश्री सुनिल देवरे यांनी व्यक्त केले.
रोहा तालुक्यातील आमडोशी संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगतगुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या भक्ती आणि शक्ती महोत्सवाचे आयोजन युवा सामाजिक बांधिलकी जोपासणारे राजेंद्र कामथे यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी देवरे मार्गदर्शनपर बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थित हभप बलकावडे महाराज , रायगड भूषण डॉ श्याम लोखंडे, नंदकुमार मरवडे सर, सोपान जांभेकर,शक्ती भक्ति मोहत्सव व्यवस्थापक पुणे तथा आमडोशी चे ग्रामस्थ सामजिक युवक राजेंद्र कामथे अणि परिवार व त्यांचे सहकारी प्रथमेश भोसले,गणेश भोसले,सुरेंद्र जांबेकर, व इतर सहकारी वर्ग आणि ग्रामस्थ मंडळ गावातील सर्व,बचत गटातील महिला मंडळ मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सुनील देवरे पुढे म्हणाले की, मी माझ्या गावात शिवशाही नांदते हे मी केव्हा बोलेल यासाठी वरिष्ठाचे मार्गदर्शन जरुरीचे आहे. यासाठी तरुण व वरिष्ठ हे एकत्र येणे जरुरीचे आहे. ज्या प्रमाणे माँ जिजाऊने शिवबावर चांगले संस्कार केले. हिच भूमिका आजच्या आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी केली पाहिजे.तसेच ज्याला आपण निवडून दिले त्यांनी समाजासाठी चांगले काम केले पाहिजे.स्त्रीयांना संरक्षण दिले पाहिजे. आमडोशी गावातील बचत गट रायगड जिल्ह्यात प्रथमस्थानी असल्याचा आनंद व्यक्त करत येथील वारकरी संप्रदाय अतिशय मोठा आहे यामुळे माझ्या गावात शिवशाही खऱ्या अर्थाने नांदेल यात कोणतीही शंका नसल्याचे सांगितले.
भक्ती व शक्ती महोत्सव कार्यक्रम प्रित्यर्थ तब्बल १३५ सन्मानपत्र प्राप्त करणारे आदर्श शिक्षक नंदकुमार मरवडे सर यांना संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज पुरस्कार व रायगड जिल्ह्यात पहिला क्रमांक आलेल्या आमडोशी येथील श्री समर्थ महिला गट याला राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले गावातील अशा सेविका ,निधी जांबेकर, परिचारिका,सुनीता जांबेकर, जयश्री जांबेकर, पोलीस कर्म चारी रेवती जांबेकर ,अंगणवाडी सेविका, अनिता जांबेकर मदतनीस रचना कामथे यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या शुभेहस्ते सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वलन संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज व राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पूजन मान्यवरांचे स्वागत तसेच पुरस्कार व्यक्तीचा सन्मान सोहळा तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कामथे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. प्राची कामथे कु .समृद्धी जाधव यांनी करून आभार प्रदर्शन व जय जिजाऊ जय शिवराय अभिप्रीत आरती करत याची सांगता करण्यात आली .
Be First to Comment