सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यातील करंजा व फुंडे गावातील १० ते १२जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये लहान-मोठे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर इंदिरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उरण तालुक्यातील अनेक गावांत कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांना खाण्यास मिळत नसल्याने त्यांनी मोर्चा लहान मुलांवर वळत त्यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली.
आज तर कुत्र्यांनी कहर करीत करंजा गावातील पाड्यातील जवळपास ९ ते १० जणांवर कुत्र्यांनी हल्ला करून त्यांचे लचके तोडले. तसेच फुंडे गावातील २ लहान मुलांवर हल्ला करीत अनेक ठिकाणी चावे घेतले आहेत. एका मुलांवर तर कुत्र्यांनी सलग दोन दिवस हल्ला केला आहे. त्यांच्यावर इंदिरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज एकाच दिवशी करंजा गावातील ९ ते १० जणांना चावे घेतल्याने गावात कुत्र्यांची दहशत पसरली आहे. अशा पिसाळलेल्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

कुत्रे गावात टोळीने फिरत असल्याने एखाद्यावर हल्ला केला तर काही क्षणातच अनेक ठिकाणी चावे घेऊन लचके तोडतात. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या माणसांचा समावेश आहे. त्यामुळे जनतेत कुत्र्यांच्या बद्दल भीतीचे सावट निर्माण झाले आहे. याला वेळीच आळा घातला नाहीतर हे कुत्रे एखादयाचा बळी जाण्याची शक्यता आहे.








Be First to Comment