Press "Enter" to skip to content

मृत्यंजय मी

मृत्यंजय मी

व्यथा मांडू कशी समजत नाही
शब्दांची घडी नीट बसत नाही
किती आक्रोश अंतरी माझ्या
याला काही मोजमाप नाही

उच्च आभूषणे मिरवण्यास होती
सोबतीला मात्र अवहेलनाच होती
असूनी पुत्र मी लोहगोलाचा
लाभला सहवास सदैव काळोखाचा

नात्यांच्यात असून ज्येष्ठ मी
कनिष्ठ म्हणून हिणवला गेलो मी
शापित आयुष्य जगण्यासाठी
फक्त का जन्मास आलो मी

असे आयुष्य न कोणाच्या भाळी यावे
कर्ण म्हणून कोणी न जन्मा यावे
कवचकुंडलाचे असूनही वरदान
आयुष्य माझे जाहले पायदान

रणांगणी आता निपचीत पडलो होतो
तृप्त मी आता, मरणासन्न जरी होतो
तुच्छ जन्माचे सार्थक आज झाले होते
याचक म्हणून साक्षात इंद्र अवतरले होते

कर्णच प्रत्येकाचा सखा होतो
एकमात्र कर्णापरी दाता होतो
कृष्ण अर्जुन पांडव होतील बहु
मृत्युंजय मी एकटाच होतो…..

मयुरेश आडकर, वांगणी, बदलापूर

One Comment

  1. Mayuresh adkar Mayuresh adkar March 30, 2021

    मनापासून धन्यवाद.

Leave a Reply to Mayuresh adkar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.