Press "Enter" to skip to content

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे च्या प्रांगणात महाराष्ट्र दिन मोठा उत्साहात साजरा


आवरे प्रतिनिधी (सचिन पाटील)

आवरे येथील आत्माराम ठाकुर मिशन संचलित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरे येथें महाराष्ट्र दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रतिक ठाकूर यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. राष्ट्रीय ध्वज फडकवल्यानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत व महाराष्ट्र गीत हे विद्यार्थ्यांनी सादर केले तदनंतर राष्ट्रीय घोष वाक्याने संपूर्ण शाळेसभोवतलीचा परिसर हा दुमदुमूला. भारत माता की जय वंदेमातरम अश्या घोषणा दिल्या नंतर महाराष्ट्र दिनविशेष म्हणून विद्यार्थ्यांनी भाषण सादर केली तसेच शालेय सहशिक्षक अनिल पाटील सर संस्थेचे अध्यक्ष प्रतिक ठाकूर सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार वामन ठाकूर सर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे मॅडम विद्यालयातील शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम आयोजनाचे विशेष जबाबदारी ही इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतली सर्वांनी विशेष मेहनत घेत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. अशा प्रकारे जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे येथे महाराष्ट्र दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.