Press "Enter" to skip to content

उन्हाळी शिबीर उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणे, श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा तसेच ग्लोबंट इंडिया प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने “पढाई से दोस्ती” व “विकास मित्र” उपक्रम


खांब,दि.३(नंदकुमार मरवडे)

ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणे, श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा तसेच ग्लोबंट इंडिया प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात “पढाई से दोस्ती” व “विकास मित्र” या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरातंर्गत वरसे येथे आयोजित शिबिरात वाशी, धाटाव, वरसे, तळाघर, उडदवणे, मूठवली, देवकान्हे, बारसोली व किल्ला, आश्रमशाळा,भालगाव,सुडकोली,सानेगाव,विरजोली,कोकबन आदी ठिकाणच्या प्राथ.व माध्य.शाळांतील सुमारे ४०० विद्यार्थी वर्गाने महत्वपूर्ण सहभाग नोंदवून शिबिरातील विविध प्रकारच्या उपक्रमांचा अभ्यास केला तसेच आपापले कलाकौशल्य सादर केले.

या शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व मनोरंजक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पद्य व मनाचे श्लोक म्हणणे, टाकाऊ वस्तूंमधून गावाची प्रतिकृती तयार करणे, मैदानी खेळ, गटकार्य, जाहिरात निर्मिती, चित्रकला, क्राफ्ट, दोरी उड्या, भाषिक खेळ, आईस्क्रीम स्टिकपासून घर तयार करणे, म्हणी अभिनयातून ओळखणे, वाक्यरचना, टोपी तयार करणे तसेच वर्तमानपत्र व कागद वापरून फुलदाणी तयार करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान प्रबोधिनी, पुणे यांच्यातर्फे प्रकाशित होणारे “छात्र प्रबोधन” मासिक भेट देण्यात आले.

या शिबिरांमध्ये स्थानिक शाळांतील शिक्षकांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. तसेच विविध मान्यवर व्यक्तींनी शिबिरांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. पालक, गावातील सरपंच व इतर सदस्यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता व समूहभावना वाढीस लागली असून शिक्षणाविषयी गोडी निर्माण होण्यास मोठी मदत झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुणे येथून ओंकार बाणाईत सर, प्रकाश ननवरे सर, अविनाश दादा काठवटे व सुरेखा ताई यांनी उपस्थिती लावली. तसेच रोहा तील अंशुल कंपनीचे श्री. किशोर तावडे सर, विरजोली शाळेचे अडसूळ सर, धाटाव शाळेच्या मोरे मॅडम, VRTI येथील रिटा ताई, प्रसाद भोईर व प्रसाद दगडे उपस्थित होते.या शिबिरांमध्ये तेजल नवशे, स्वप्नाली आकलेकर, पूजा जाधव व संपदा शिर्के यांनी श्री. ओंकार बाणाईत यांचे मार्गदर्शनाने काम पाहिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.