महेंद्र घरत यांची कामगार क्षेत्रातील ३४ वर्षांची दैदिप्यमान कारकिर्ट पुन्हा एकदा सिद्ध
सिट बेल्ट । कामगार प्रतिनिधी ।
सन १९८७ २०२१ कामगार क्षेत्रातील ३४ वर्षांची दैदिप्यमान कारकिर्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली. रायगड, नवी मुंबई मधील कामगारांच्या न्याय हक्कांसाठी सदैव उमदे नेतृत्व करणारा सदाबहार नेता म्हणजे गल्ली ते दिल्ली नव्हे थेट आंतरारष्ट्रीय पातळीवर ITF – ILO च्या माध्यमातून ILC पर्यंत नेतृत्वाचा दबदबा निर्माण झालेला आहे, असे झुंझार कामगार नेते महेंद्रजी घरत यांचा नेतृत्वाचाप्रत्यय पुन्हा आला.
सेंन्ट्रल वेअरहाऊसिंग कारपोरेशन (सी.डब्लू. सी. द्रोणागिरी नोड) कंपनीच्या गेटवरील युनियन नामफलक अनावरण कार्यक्रमाचा वेळी. या कंपनीच्या सुरूवातीला फक्त रू. ७००/- महिना पगारावर २५० कामगार काम करीत होते अनेक युनियन व प्रकल्पग्रस्त नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला परंतु कंत्राटदाराच्या दादागिरी समोर सर्व हतबल ठरले सरते शेवटी कामगारांनी माझगाव डॉक मधील १०१ कामगारांना ११ वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली फक्त १ वर्षांत सरकारी नोकरीत कायम करण्यात यशस्वी झालेले कामगार क्षेत्रातील क्षितीजावर उगवता असलेला तारा कामगार नेते महेंद्र घरत यांचे नेतृत्व स्विकारले.

महेंद्र घरत यांनी पदार्पनातच व्यवस्थापनाची दादागिरी मोडून काढली व कधीही बोनस न मिळालेल्या कामगारांना पहिल्याच टिपावलीला साडे बारा टक्के बोनस मिळवून आपल्या धडक नेतृत्वाचा प्रत्ययच दिला. पुढे अनेक वर्षे या कामगारांचे नेतृत्व करीत रू. ७०० पासून २०,०००/- पर्यंत पगारवाढ करीत, बोनस, ग्रज्युईटी, सुट्या अनेक सुविधा मिळवून देण्यात यशस्वी झाले.
२०१४ च्या निवडणुकीत महेंद्र तरत कॉँग्रेसचे उमेदवार होणार म्हणून विरोधी पक्षांनी (शेकाप – शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे कम्युनिष्ट इतर सर्व संघटना) एकत्र येऊन षडयंत्र करून अनेक कंपन्यामधील महेंद्र घरत यांचे नेतृत्व काढण्यासाठी सर्व नाटकं केली आणि यांच्या षडयंत्रमुळे युनियन बदलली मात्र अनेक षडयंत्रकारी कंपुमुळे कामगार देशोघाडीला लागले. मालक शिरजोर झाले, मालकांवर कामगार नेते महेंद्र घरत यांचा असलेल्या अंकुशामुळे त्यांना परप्रांतीयांची भरती करता येत नव्हती, परंतू महेंद्र घरत यांचा दबदबा कमी झाल्यामुळे NSIGT मध्ये ३५० परप्रांतीय कामगारांची भरती झाली षडयंत्रकारांना कुत्रे विचारायचे नाही अशी अवस्था झाली. CWC चे ३ युनिट बंद पडले शेकडो कामगारांवर उपासमारीची पाळी आली.
२०० संघटनांच्या माध्यमांतून जगाची शीर्ष संघटना ILO साठी भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान जरी मिळाला असलातरी, घार हिंडते आकाशी तिची नजर मात्र पिल्लापाशी या उक्तीप्रमाणे काम करत असताना स्थानिक पातळीवर चाललेली कामगारांची गळचेपी मात्र त्यांना अस्वस्थ करीत होती, त्यांनी पुन्हा जोमाने कामाला खुरूवात केली व कामगारांना उमजून चुकले, षडयंत्रकारी फक्त आपल्या राजकीय फायदयासाठी एकत्र आले, कामगारांच्या प्रश्नांशी, उपामारीशी त्यांना काही एक घेणेदेते नव्हते त्यांना मात्र आपली राजकीय पोळी कामगारांच्या उपासमारीच्या तव्यावर भाजायची होती आता सर्व कामगार परतले, पुन्हा न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना म्हणजेच महेंद्र घरत यांच्या युनियन से सभासदत्व स्विकारले. भाई तुमच्या शिवाय पर्याय नाही “नाठाळ अधिकाऱ्यांना तुम्हीच वठणीवर आणू शकता. असा विश्वास कामगारांमध्ये झाल्यामुळे सी.डब्लू. सी कंपनी गेटवर पुन्हा एकदा महेंद्र घरत यांचा नेतृत्वाचा झेंडा मानाने फडकला. भिऊ नका मी तुमच्या पाठीशी” सदैव उभा आहे. कामगार समृद्धीचा, चळवळीचा घेतला वसा मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टाकणार नाही असा विश्वास त्यांनी CWC कामगारांना यावेळी दिला.
यावेळी संत्रटनेचे पदाविकारी विनोद म्हात्रे, वैभव पाटील, किरीट पाटील, संजय ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, अंगद ठाकूर, आनंद ठाकूर विवेक म्हात्रे, आदीत्य घरत, राजेंद्र भगत, रेखा घरत, कल्पना ठाकूर, निर्मला पाटील, चंद्रकांत ठाकूर व इतर कामगार उपस्थित होते.








Be First to Comment