काटा
रूततो कुणास काटा
सुटतो क्षणैक धीर
परक्यास काय त्याचे
हसती जसे ‘ असूर ‘
कुणी बोलतील माघे
आहे जरा ‘ अधीर ‘
जळतो तयास कळते
उठतो कसा हा धूर
नाही कुणास काही
गळले किती रुधीर
सलतो तसाच काटा
जणू बोलके बाधीर
माहित काय काट्या
कोणास बोचला तो
स्वधर्म जाणूनी हा
बघ वेदनाच देतो
क्षणैक सांगूनी गेला
ही पायवाट नाही
नवीवाट शोधतांना
रूतती काटेचं पायी
सुमिता सबनीस,
ता. सेलू जि.परभणी







Be First to Comment