Press "Enter" to skip to content

न्यु मॅरीटाईम ॲन्ड जनरल कामगार संघटनेचे यश

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या माध्यमातून हिंद टर्मिनल सफाई कामगारांना पगारवाढ

सिटी बेल लाइव्ह । उरण ।

कोरोनामुळे अर्थव्यवस्था ढासळली असतांना अस्थापनांना उदयोगधंदे सुद्धा सांभाळणे कठीण जात आहे. अशा परीस्थीतीत सुद्धा कामगार नेते महेंद्रजी घरत यांची न्यु मॅरीटाईम ॲन्ड जनरल कामगार संघटना व्यवस्थापन व कामगार यांची योग्य सांगड घालत कामगारांना स्वाभी मानाने जगता येईल असे प्रयत्न करत आहे.

कोरोनाचा कोणताही परिणाम संघटनेच्या कामकाजावर झालेला नाही. दरवर्षी १८ ते २० करार होत असतात त्याच प्रमाणे जानेवारी २०२१ पासुन तिसरा पगारवाढीचा करार, हिंद टर्मिनल मधील सफाई कामगारांसाठी ३२००/- रूपये पगारवाढीचा करार दिनांक १९ मार्च रोजी सहाय्यक कामगार आयुक्त, रायगड यांच्या कार्यालयात श्री आंधळे साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या करारनाम्यानुसार कामगारांना तीन वर्षासाठी ३२०० रूपये पगारवाढ, बोनस, रजांमंधे वाढ, गणवेश व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले.

या करारनाम्याप्रसंगी न्यु मॅराटाईम ॲन्ड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष पि.के.रामण, सरचिटणीस वैभव पाटील, मे. सद्गुरू कृपा चे व्यवस्थापक अभिजीत पाटील व गजानन शिंदे तसेच कामगार प्रतिनिधी शशिकांत भोईर, गणेश कोळी, सुनंदा पाटील, मेहिनी ठाकूर, वैशाली घरत, हौसा ठाकूर आदी उपस्थीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.