स्त्री जन्मा तुझी कहाणी
अग तू अशी कशी ग गुलाम कायमची
जन्मापासूनच बंधने साऱ्या जगाची
जन्मापासून मरेपर्यंत सारी बंधने पालायची
स्वतःचे मन मारून साऱ्याची मने राखायची
जन्मल्या घरातच दुजाभावाची वागणूक मिळायची
बंधुरायाना मात्र पूर्ण मुभा वागण्याची असायची
मुलगी म्हणजे परक्याचे धन असे सारखे टोचून बोलायचे
माझ्याच जन्मघरापासून परके करण्याचे ऐकवायचे
माझे अस्तित्व विसरून मी अनोळखी घरात रुजायचे
स्वतःची ओळख विसरून सासरच्या मर्जीने जगायचे
देवकृपेनें बसली नीट घडी तर देवाचे आभार मानायचे
नाहीतर चूक नसताना खापर आपल्या डोक्यावर घ्यायचे
मुलगी शिकली प्रगती झाली हे फक्त बोलण्यापुरते
एकविसाव्या शतकात तिची परवड कायम सुरूच असते
कितीही वय असो नजरा मेल्याच्या स दा वखवखलेल्या
विसरून चांगल्या संस्कारांना निर्लजपणे दाखवतात वाकुल्या
जागतिक महिला दिनी हेच करतात खोटा खोटा उदो उदो
पण नारीचा मान सन्मान राखण्या आडवा येतो यांचा इगो
शिवरायांची शिकवण रुजवली पाहिजे सर्वाना लहानपणी
तरच इथून पुढे सुरक्षित राहतील आपल्या आयाबहिणी
विलास चव्हाण, नवीन पनवेल







Be First to Comment