सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा नंदकुमार मरवडे ।
रोहा – अष्टमी नगर पालिका हद्दीतील अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेल्या पंचक्रोशीतील श्रीक्षेत्र मराठा आळी अष्टमी येथील श्री विठ्ठल – रुक्मिणी मूर्ती चे रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधत दीड दिवसीय अखंड हरिनाम यज्ञ व ग्रंथ राज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण आदी भक्तीमय सोहळा स्वा.सु.नि.गुरुवर्य. अलिबागकर महाराज,स्वा.सु.नि.गुरुवर्य वै.गोपाळ बाबा वाजे महाराज, यांच्या कृपाशीर्वादाने हभप. गुरुवर्य नारायण दादा वाजे महाराज( मठाधिपती – पंढरपूर) रायगड भूषण हभप.गुरुवर्य बाळाराम महाराज शेळके यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आला.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम यज्ञ व ग्रंथ राज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण या दीड दिवसीय सप्ताहाचे निमित्ताने पहाटे काकड व आरती तसेच श्री.विठ्ठल – रुक्मिणी श्रींची महापूजा,सका श्रींच्या मूर्तीवर महाअभिषेकव ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या ९ व्या व १२ व्या आध्यायचे सामुदायिक पारायण सायंकाळी हभप. उदय महाराज बंद्री- खारगाव, हभप अनिल महाराज सानप वरसगाव यांचे प्रवचन सेवा तद्नंतर सायंकाळी सामुदायिक हरिपाठ,रात्रौ हभप. गुरुवर्य नारायण दादा वाजे महाराज( मठाधिपती – पंढरपूर) यांचे सुश्राव्य हरी कीर्तन सेवा, तर दुसऱ्या दिवशी द्वादशी निमित्ताने सकाळी १०:३० ते १२:३० वाजेपर्यंत युवा कीर्तनकार हभप.राम महाराज सावंत ( मुठवली खु.- रोहा) यांचे काल्याचे कीर्तन सेवा तद्नंतर याप्रसंगी गावांतील गत वर्षी मृत पावलेले महत्त्व पूर्ण योगदान देणारे व समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आदी विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांतर्गत श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती.
सदरील कार्यक्रमाअंतर्गत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली होती हभप.महादेव बुवा साळवी, पुजारी अनंत तुकाराम चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.विठ्ठल – रुक्मिणी मंदिर कमिटिचे सर्व पदाधिकारी व सभासद वर्ग ग्रामस्थ मंडळ,महिला मंडळ, नवतरुण मित्र मंडळ,ज्येष्ठ – श्रेष्ठ नागरिक -मराठा आळी यांनी अथक परिश्रम घेतले..
Be First to Comment