सलामी
सोनचाफ्यास खास सलामी
तया अंतरी गंध त्सुनामी
सचैल तनमन माझे हसते
अबोल असणे त्याचे रुचते
कुंतलात चाफ्यास माळता
गुपीत माझे त्याला कळता
दोन मनांचे मैत्र जुळवतो
एक लाजरी भेट घडवतो
मंद वाजते समीर हलगी
दोन जिवांची सलज्ज सलगी
संपताच क्षण सुकून जातो
प्रीतीचे पण बीज रुजवतो
बोलघेवडा नसे जरी तो
मौनातुन परमार्थ साधतो
कथा सोनचाफ्याची गोड
कसे न लागावे मज वेड?
निलिमा देशपांडे, नवीन पनवेल.







Be First to Comment