Press "Enter" to skip to content

रोहे तालुक्यात नुकसान भरपाईबाबत “कही खुशी कही गम”

नुकसानग्रस्तांचे फेर पंचनामे करुन योग्य मोबदला मिळवून देण्याची मागणी


सिटी बेल लाइव्ह / रोहे,दि (शरद जाधव)


रोहे तालुक्यात ३ जून रोजी नैसर्गिक चक्रीवादळाने सा-यांचेच फार मोठे नुकसान केले.या नुकसानीबाबत शासनाने विनाविलंब तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देखील मिळवून दिली. तरीही या नुकसान भरपाई बाबत काहीजणांचे जास्त नुकसान झाले आहे. त्यांना योग्य मोबदला मिळाला नसल्याने नुकसान भरपाई बाबत तालुक्यात सध्या कही खुशी कही गम अशीच परिस्थिती आढळून येत आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी अशा नुकसानग्रस्तांचे फेर पंचनामे करुन योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारची मागणी अन्याय झालेल्या नुकसानग्रस्तांकडून होऊ लागली आहे.
नैसर्गिक चक्रीवादळाने रायगड जिल्यात मोठाच धुमाकूळ घातला.तर या चक्रीवादळाने रोहे तालुक्याचेही फार मोठे नुकसान केले.केवल दैव बलवत्तर म्हणून कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. अगोदरच सरकार कोरोना या महामारीचे चक्रव्यूहात अडकले आहे.असे असताना जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी मिळेल यासाठी शासन दरबारी आवाज ऊठवून रायगडला झुकते माप देऊन पंचनामे करण्यापासून ते नुकसान भरपाई मिळेपर्यंत तातडीने लक्ष दिले.मात्र असे असतानाही ज्या़ंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशा काही नुकसानग्रस्त नागरिकांना योग्य तो मोबदला मिळाला नसल्याची प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत.सरसकट पंधरा हजार रू.अनेकांना मिळाले.परंतू त्याच्या पटीत नुकसानही तेवढेच असेल का ?असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.याबाबत तळाठी व ग्रामसेवक यांच्याकडे विचारणा केली असताना उडवाउडवीची उत्तरेही मिळत आहेत.यामुळे सध्या हा प्रश्न अतिशय गहन झाला आहे.विशेषतः कोलाड विभागातील अनेक गावात असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे ग्रामसेवक, पंचायतीमधील लोकप्रतिनिधी यांनी याबाबत खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्याकडे मागणी करून हा ग्रहण प्रश्न सोडवावा जेणेकरून बाधितांना दिलासा मिळेल असे नुकसानग्रस्त पिडीतांकडून बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.