सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
इसांबे येथे असलेले प्राचिन शिवलिंग आज माहाशिवरात्र च्या निमित्ताने अनेक भक्तगणांने या शिवलिंगाचे दर्शन घेतले आज पहाटे पासून या परिसरातील असलेले भक्तगण या ठिकाणी येवून शिवलिंगाचे दर्शन घेत होते.नुकताच या ठिकाणी या मंदिराचा जीणोर्द्धार केला असून या ठिकाणचे वातावरण सुंदर असून सभोवताली सुंदर वृक्ष आणी तलाव यामुळे येथिल सौंदर्यात भर पडत आहे.
कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रत्येक भक्त गणांनी आपल्या गावाच्या परिसरात असलेले प्राचिन शिवलिंगाचे दर्शन घेत असल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत होते. तालुक्याच्या ठिकाणी असलेले प्राचिन शिवलिंग तुपगाव येथिल धान्येश्वर मंदिर,पाताळगंगा येथिल रसवेश्वर मंदिर तर गुळसुंदे सिद्धेश्वर मंदिर अश्या विविध ठिकाणी असलेले शिवमंदिर येथे जावून प्रत्येकांनी या शिवलिंगाचे दर्शन घेतले.त्याच बरोबर कामगार तसेच व्यवसायिक अश्या विविध व्यवसाय करणारे नागरिकांनी सकाळी लवकर उठून या शिवलिंगाचे दर्शन घेतले.
Be First to Comment