सिटी बेल लाइव्ह । श्रीनिवास काजरेकर । नवीन पनवेल ।
नवीन पनवेल परिसरात महाशिवरात्री भक्तिभावात संपन्न झाली. परंतु
यंदा कोरोनाच्या संकटामुळे विविध ठिकाणी होणारे धार्मिक, आध्यात्मिक तसेच गायन, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम ऑनलाईन किंवा घरगुती स्वरुपातच संपन्न झाल्याचे चित्र पहायला मिळाले. गुगलमीट, झूम अॅप अथवा फेसबुक लाईव्ह आदी तंत्रज्ञानाचा वापर करून बऱ्याच ठिकाणी काही कार्यक्रम संपन्न झालेले दिसून आले.
नवीन पनवेल ब्राह्मण सभेच्या वतीने सामुदायिक शिवमहिम्न स्तोत्रपठणाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. यातील सहभागी भाविकानी आपल्या घरातुनच ऑनलाईन पद्धतीने सामुदायिक स्तोत्रपठणाचा आनंद घेतला.

भाविकांची गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंद असल्याने त्या सभामंडपात होणारे, गायन, भजन, कीर्तन आदी कार्यक्रमही काही भाविकांनी आपल्या घरामधे निवडक रसिकांसह संपन्न केले. काही ठिकाणी ते फेसबुकवर लाईव्ह दाखवण्यात आले.
परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
नवीन पनवेल ब्राह्मणसभेच्या वतीने विविध सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम सामुदायिक स्वरूपात केले जातात. यंदा कोरोनामुळे सुरक्षेचे मोठे आव्हान असल्याने मंदिरात किंवा अन्य ठिकाणी एकत्र येणे अशक्य होते. म्हणून आम्ही परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून ऑनलाईन स्वरुपात स्तोत्रपठणाचा आनंद घेतला.
माधुरी सहस्रबुद्धे
ब्राह्मण सभा, नवीन पनवेल








Be First to Comment