सिटी बेल लाइव्ह। । श्रीनिवास काजरेकर । पनवेल ।
जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका कै. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ महिलांसाठी नारदीय कीर्तनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वय वर्षे २० ते ४० या वयोगटातील महिलांसाठी आयोजित ही स्पर्धा विरुपाक्ष मंदिरात संपन्न झाली.
यात राज्यभरातील महिला कीर्तनस्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या स्पर्धेत गौरी खांडेकर हिने प्रथम, ज्योत्स्ना गाडगीळ हिने द्वितीय, सायली मुळे हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. सुखदा मुळे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

विद्यमान नगरसेविका रुचिता लोंढे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. ह.भ.प. समीरबुवा ओझे आणि अंजली जोशी यांनी स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम पाहिले. नंदकुमार कर्वे व वैशाली कुलकर्णी यानी संवादिनीसाथ तर गणेश घाणेकर यानी तबलासाथ केली. किरण बापट यानी सूत्रसंचालन केले. गुरुनाथ लोंढे परिवार, चंद्रकांत मने, हर्षदबुवा मांजरेकर आदींनी स्पर्धेच्या नियोजनासाठी मोलाचे योगदान दिले. कीर्तनगुरू नंदकुमार कर्वे आणि राजेन्द्र मांडेवाल यानी स्पर्धकाना मोलाचे मार्गदर्शन केले.
“कीर्तनपरंपरा हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. सध्याच्या मोबाईल युगातही आपले संस्कार टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य या कीर्तनामधे आहे. नवोदित कीर्तनकाराना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा किंवा उत्सव आयोजित करणे ही काळाची गरज आहे.”
नगरसेविका रुचिता लोंढे
आयोजक








Be First to Comment