सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनात खालापूर तालुकास्तरीय दहा दिवसीय बौध्दाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.हे शिबीर भारतीय बौद्ध महासभेचे खालापूर तालुका अध्यक्ष शंकर रामचंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
या श्रामणेर शिबिरात राष्ट्रीय सचिव एम.डी.सरोदे गुरुजी यांनी भन्ते शिवली बोधींना मार्गदर्शन केले.या श्रामणेर शिबिरासाठी पुज्य भंते बि.सारीपुत व शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय एम.डी.सरोदे गुरुजी होते.यावेली सरोदे गुरुजी यांनी कल्याण, अंधश्रद्धा, व्यसन,सदवर्तंन आदी विविध विषयांवर यांच्या केले.या शिबिराची सांगता समारोप रविवार सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मान्यवरांचे आभार मानत बौध्दाचार्यं श्रामणेर प्रशिक्षण शिबीराच्या सांगता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेली व्यासपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे राज्य कोषाध्यक्ष विजय कांबळे, राष्ट्रीय सचिव बि एच. गायकवाड, राष्ट्रीय सहसचिव राजेश पवार,जिल्हाध्यक्षा संपदाताई चव्हाण, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष प्रकाश सोनावले,विजय गायकवाड, जिल्हा महिला उपाध्यक्षा उषाताई कांबळे, जिल्हा संघटक रेखाताई जाधव, जिल्हा संरक्षण सचिव रमाताईं गांगुर्डे, जिल्हा आॅडिटर कमलताईं वाघमारे,सुनंदाताई वाघमारे, जगदीश कांबळे,अॅड.मिलिंद गायकवाड, तालुका सरचिटणीस महेंद्र निकालजे, तालुका कोषाध्यक्ष रमाताईं मोरे, जिल्हा ग्रंथपाल टि.बि.त्रिभुवन,पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे,कर्जंत शहर अध्यक्ष सुभाष गायकवाड आदींसह उरण,पेण,कर्जंत, पनवेल तालुक्यातील सर्व तालुका पदाधिकारी , उपासक, उपासिका,केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, समता सैनिक दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेली भन्ते शिवली बोधींनी मनोगत मांडले.
यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे उत्तम काम करणाऱ्या शाखांतील पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या खालापूर तालुका कार्यकारिणीने अथक परिश्रम घेतले.
Be First to Comment