अवैद्य वाळू उत्खनन प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार देणार : राजा केणी यांचा इशारा
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
वाळूमाफियांना अभय कुणाचे ? हजारो एकर शेतजमीन उध्वस्त करण्याचा घाट कुणाचा ? असे सवाल करीत येथील शेतजमीन वाचवण्यासाठी शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. धरमतर खाडीलगतची शेतजमीन वाळू माफियांपासून वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तक्रार देणार असल्याचा इशारा राजा केणी यांनी दिला आहे.
गेली कित्येक वर्ष धरमतर खाडीमध्ये सक्शन पंप व डेझर लावून मेढेखार खाडीतील 450 ( साडेचारशे ) एकर जमीन कशी नापिक झाली आणि शेतकरी देशोधडीला लागले तसेच कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील काचळी पिटकिरी , वाघविरा चिखली खातविरे या खाडीची खारबंदिस ही या अगोदर सक्शन पंप आणि डेझर यामुळे शेती उद्ध्वस्त झाली होती. तसेच कित्येक वर्ष कोपरी-कुर्डुस ची जोलेमंडळी संघर्ष करीत असताना सुद्धा काही राजकिय मतभेद झाल्या मुळे अनेक तक्रारी व निवेदनं देवून सुद्धा स्थानिक वाळुमाफियांनी आणलेल्या दबावामुळे कोणतीही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले.

या प्रश्नावर शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजाभाई केणी यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत उपोषण केले होते आणि त्यामुळे कुसुंबळे-कुर्डूस विभागातील शेतकऱ्यांकडून सदरचे प्रकरण महाराष्ट्र सरकारकडे गेले व त्याची दखल घेत राज्य सरकारने उद्ध्वस्त झालेल्या बंदीस्ती साठी तब्बल 12 कोटी रुपये शेतकऱ्यांना शेती वाचवण्यासाठी आता शासन खर्च करत असताना आणि शासनाची किंवा जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना ह्या धरमतर खाडीलगत असणारी 1250 एकर जमीन उद्ध्वस्त करण्याचा घाट वाळुमाफिया करत आहेत.
वाळू माफियां विरोधात लवकरच शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे स्वतः शेतकऱ्यांना सोबत घेऊन भेट घेणार व या वाळूमाफियांपासून खाडी व शेती वाचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी सांगितले.









Be First to Comment