Press "Enter" to skip to content

तब्बल 20 वर्षानंतर सापडला आरोपी : नागोठणे पोलीसांची कामगिरी

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।

रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत सुमारे वीस वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपी बेपत्ता होते त्यापैकी सुरेश मारुती सकपाळ (वय-59 वर्षे, रा. वावळोली ता. सुधागड पाली, जिल्हा रायगड) यास नागोठणे पोलिसांनी वावळोली येथून अटक केली आहे.

नागोठणे पोलीस ठाणे गु.र.न. 56/2000 भा.दं.वि.सं कलम 143, 147, 452 मधील तब्बल वीस वर्षे दोन आरोपीत हे बेपत्ता होते. सदर गुन्हयातील पाहिजे फरारी आरोपीत नामे सुरेश मारुती सकपाळ वय-59 वर्षे, रा. वावळोली ता. सुधागड पाली, जिल्हा रायगड हा मागील 20 वर्षा पासून सदर गुन्ह्यात फरार होता त्याचे विषयी पोलीस हवालदार संतोष रामचंद्र म्हात्रे यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली असता, त्याचा शोध घेणेकरीता पोलीस हवालदार संतोष रामचंद्र म्हात्रे व पोलीस हवालदार विनोद मारुती पाटील, यांचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांनी पथक तयार करुन त्यांना पाहिजे आरोपीताचा शोध घेणेकारिता रवाना केले.

सदर पथकाने त्याचे विषयी वावळोली गावातील पोलीस पाटील यांचेकडून खात्री करुन घेवून आरोपीच्या पत्त्यावर त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेवून तब्बल 20 वर्ष नंतर अटक केले आहे.

फरारी पाहिजे आरोपी यांचा शोध घेणेसाठी खास मोहीम काढून आरोपी अटक करण्याबाबत आदेश रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले होते. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ , उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा श्री.किरणकुमार सूर्यवंशी यांचे सूचनेप्रमाणे नागोठणे पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पथकास योग्य ते मार्गदर्शन करून पाहिजे फरारी आरोपींना अटक करण्याबाबत आदेशित केले होते.

सदर कारवाई पार पाडण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक अशोक दुधे, तसेच अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या सूचनेप्रमाणे रोहा उप विभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी व नागोठणे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष रामचंद्र म्हात्रे, व पोलीस हवालदार विनोद मारुती पाटील, नागोठणे पोलीस ठाणे यांनी उत्कुष्ठ कामगिरी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.