सफाई कामगारांना मिळवून दिला प्रत्येकी एक ते दीड लाख एरियस
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
जेएनपीटी टाऊनशीपमधील कामगार गेली अनेक वर्षे आपल्या सुविधांपासून वंचीत होते. त्यांचा हक्क मिळून देण्याचे काम जेएनपीटी कामगार संघटनेने केला आहे. त्याबद्दल कामगारांच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
जेएनपीटी टाऊनशीपमधील साफसफाईची कामे करणारे खासगी कामगार गेली अनेक वर्षांपासून एरियस पासून वंचीत होते. जेएनपीटी जनरल कामगार संघटनेने हा विषय हाती घेऊन संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत व जनरल सेक्रेटरी जनार्धन बंडा, माजी ट्रस्टी रवी पाटील यांनी जेएनपीटी प्रशासनाबरोबर सातत्याने पाठपुरावा करीत अखेर हा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळविले आहे.
यामुळे कामगारांना प्रत्येकी एक ते दीड लाख एरियस मिळाला आहे.

या निमित्ताने कामगारांनी आज जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत व जनरल सेक्रेटरी जनार्दन बंडा यांचा सत्कार करून कामगारांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी कामगार वर्ग उपस्थित होते.








Be First to Comment