Press "Enter" to skip to content

“कोडे”

“कोडे”

प्रकाशाशी फारकत घेऊन
आकाश निशेशी मैत्री करते
चंद्राची शीतलता घेऊन
प्रणयाचा खेळ मांडते

वेडी आशा वेडी स्वप्ने
तमाच्या मिठीत विरघळतात
पुन्हा उगवतो तो भास्कर
जीवनातील चटके दाखविण्यास

खेळ चालतो हा…
अंधार प्रकाशाचा
आकाश साक्षी असते या लपंडावाचा
शोध घेणे आकाशाने आता सोडून दिले
पृथ्वीवर शाल पांघरणे त्याने चालूच ठेवले

प्रणयाची रात्र ते विसरू शकत नाही
जीवनातील चटके सोसू शकत नाही
निसर्गाचे रहाटगाडगे ते मोडू शकत नाही
पृथ्वीवरील मानवाला ते काही सांगू शकत नाही

मानव कुंडलीतील ग्रहताऱ्यांच्या मेळ मांडतो
भविष्यातील चाहुलीचा वेध घेतो
आकाशाला न उमगलेले कोडे तो उलगडू पाहतो
स्वतःच्याच मस्तीत तो आज जगू पाहतो

धनंजय देशमुख, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.