पसारा
माय मराठी ,
कसा आवरू मी मनातला पसारा ….
विचारांची जळमटे आणि इतर सारा…
पसरतो स्वच्छंदे आणि धावतो सैरावैरा…
हाती घेता शस्त्रे होतो बिचारा कावरा बावरा…
मांडला आहे कधीचा , हा नुसता फाफटपसारा…
त्यावर जमली धूळ आणि केवळ त्याचाच दरारा…
पदर खोचून , बोलले मनासी चल आता याला आवरा…
आणि डोळ्यांतून माझिया , वाहू लागल्या अश्रुधारा…
कित्येक वर्षांपासूनी पाहते आहे , हा दैवाचा खेळ न्यारा…
मग भांडले त्याच्याशी आणि मांडला नक्षीदार देव्हारा…
त्यानेच दिली मज ऊर्जा , आवराया माझा हा पसारा…
स्वच्छ नितळ नेटके झाले , सुंदर सजले , मग त्यास नच उरे थारा…
मग मनाचिये गुंफी , गुंफला मी मोगरा , श्वासात दरवळ आणि भासस्पर्शाचा उभारा…
बसविलेच सजवूनी हृदयी तयासी , जो आहे मजसी प्यारा…
घेतले तयाने कवेत मजसी , आणि तोच माझा सखा खरा…
मग संपला पसारा , संपला पसारा…
,सौ.मधुरा राजेंद्र काळे., खारघर







Be First to Comment