मुंबईतील दोन तरुणाना कुंडलिकेच्या पात्रात जलसमाधी
सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।
रोह्यात मुंबईहुन बाहे गावी आपल्या मित्राकडे सहलीसाठी आलेले मित्र कुंडलिका नदी पात्रात बुडाले. धाटाव विभागाच्या हद्दीतील कुंडलिकेत पोहायला गेले असता त्यांना पाण्याच्या प्रवाहाचे अंदाज न आल्याने नदीच्या पात्रात दोघेही बुडाल्याची खळबळजनक घटना शनीवारी दुपारच्या दरम्यान घडली.मात्र त्यापैकी एक जण बचावला आणि दोघे जण बुडाल्याने आज त्यांचे मृतदेह दुपारी सापडले.
बाहे गावी मुंबईहून २५ जण आपल्या मित्राच्या गावी सहलीसाठी आले होते त्यापैकी काही तरुनाना शनीवारी दुपार दरम्यान पोहण्याचा मोह आवरला नाही.पोहत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने त्यांना अंदाज आला नाही.धाटाव गावाच्या शेजारील कुंडलिकेत पोहत असताना त्यापैकी एक जण बुडत होता.मात्र त्याला वाचविण्यासाठी गेलेल्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले.तर एकाला वाचविण्यात यश आले.
बुडालेल्या पैकी अजिंक्य जयराम साळवी (३०)काळा चौकी मुंबई,प्रणव राजाराम परब(३०)काळा चौकी मुंबई,यांचे मृतदेह आज रोहा कोलाड रस्त्यालगत असलेल्या प.पू.पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालयाच्या मागील बाजूस कुंडलिकेच्या पात्रात वरील दोघांचे मृतदेह सापडले.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह सापडलेल्या तरुणांना रोह्यातील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता नेण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेबाबत पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.म्हशीलकर व कुठे यांसह सहकारी अधिक तपास करीत आहेत.मात्र आजवर कुंडलिकेत बुडण्याच्या वारंवार घटना घडल्या आहेत.







Be First to Comment