Press "Enter" to skip to content

वर्धमान रेसिडेन्सी गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्साहात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे ।

रोहे तालुक्यातील वरसे ग्राम पंचायत हद्दीतील  वर्धमान रेसिडेन्सी सोसायटीमध्ये गणपती मंदिरात प्रथम वर्षीय श्री गणेश जयंती उत्सव सोहळा धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
      

आश्विन महिन्यामध्ये विजय दशमी निमित्ताने वर्धमान रेसिडेन्सी गणपती मंदिरामध्ये नव्याने गणेश मुर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले होते. मंदिराच्या प्रथम वर्षीय श्री गणेश जयंती सोहळ्याचे औचित्य साधत गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक, विधिवत महापूजा,हळदीकुंकू, सायं.महाआरती  तर रात्रौ.०८:०० वा.ओम साई भजन मंडळ दमखाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित जागर भजन आदी धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले.
    

या कार्यक्रमातंर्गत उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा सोसायटीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी रायगड भूषण हभप. बाळाराम महाराज शेळके,भजन सम्राट सुरेश पाटील गुरूजी,अमोल बिरवाडकर,ओम दुर्गेश धाटावकर,अरुण माने,हरिश्चंद्र पाटील आदी मान्यवरांनी सदिच्छा भेटी देऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीचे दर्शन घेत सोसायटीच्या या उपक्रमाचे जाहिरपणे कौतूक केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्धमान रेसिडेन्सी च्या सर्व रहिवासी सभासद मंडळ- महिला मंडळ,तरुण मित्र मंडळ,ज्येष्ठ नागरिक सभासदांनी अथक परिश्रम घेतले..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.