रथसप्तमी
सप्त अश्वारूढ होऊनी सूर्य देवाची स्वारी आली,
भूतलावर दारोदारी रांगोळी रेखियली.
गुळपोळी अन् खिरीने नैवेद्याची पाने सजली.
पाहूनी स्वारी सूर्य देवाची प्रसन्न झाली.
माग मानवा काय हवे तूज वचन मी देतो तूझे सर्व मनोरथ पूर्ण करितो.
काही नको देवा वसुंधरेच करा जतन, निसर्ग नियमावर ठेवा नियंत्रण.
उदास होऊन हसले,
म्हणती…. मानवच शत्रू मानवाचा झाला, काय म्हणावे या कृत्याला.
परि नको होऊ हताश, उदास
सर्व संकटास भस्म करूनी
रक्षण करितो तूझी अवनी🌎
शुभांगी कुलकर्णी, नवीन पनवेल







Be First to Comment