Press "Enter" to skip to content

हर्ष म्हात्रेला उपचारासाठी मदतीची गरज

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

तालुक्यातील उरण कोप्रोली येथील हर्ष रुपेश म्हात्रे या अवघ्या ३ वर्षीय मुलाला ब्लड कॅन्सर या आजाराने ग्रासले आहे. हर्षच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उपचारासाठी मदतीची गरज आहे. तरी मदतगारांनी मदतीचा हातभार देण्याचे आवाहन हर्षच्या कुटूंबियांनी केले आहे.

हर्ष म्हात्रे या ३ वर्षीय मुलाला ब्लड कॅन्सर आजाराने ग्रासले आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आत्तापर्यंत शर्थीचे प्रयत्न त्याचे कुटूंब करीत आहेत. पैशाच्या अभावामुळे पुढील उपचार करण्यासाठी ते हतबल झाले आहेत. पुढील उपचारासाठी मदतीची गरज आहे. तरी समाजातील दानशूर व्यक्तींकडून जे काही शक्य आहे त्या प्रकारची आर्थिक मदत जमा करण्याचे आवाहन हर्षच्या कुटूंबाने केले आहे.

हर्षच्या पुढील उपचारासाठी ज्यांना कोणाला आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी हर्षचे वडील रुपेश म्हात्रे यांचे खाते क्रमांक 618002010000156 (SB
IFSC CODE : UBIN0561801 या अकाऊंट नंबरवर करण्याचे आवाहन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.