सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
माघ महिन्यामध्ये गणपती उत्सव येत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा करण्यात आला.विशेष या उत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमाची रेलचेल सुरु होती.माजगांव येथिल असलेल्या विठोबा रखुमाई मंदिरात माघी गणपती उत्सवांची सांगता करण्यात आला.
सकाळी गणेश पूजन,सत्यनारायण महापुजा,हरिपाठ,महिला वर्गांसाठी कुंकु तसेच रात्री भजन रुपी सेवा नथुराम गडगे,हरीबुवा गडगे यांनी महाराष्ट्रातील असलेल्या विविध राज्यामध्ये जावून भजनांच्या समवेत हरिपाठ गायले असल्यामुळे आज माघी गणपती उत्सवांच्या निमित्ताने माजगांव येथे भजन गायन झाले.मृदुं गमणी राहुल जाधव,गडगे यांनी सुंदर असे भजन गाऊन ग्रामस्थांची मने जिंकली.तसेच या भजनांच्या माध्यमातून सांगता करण्यात आली.
गेली सोळा वर्ष माजगांव विठोबा रखुमाई मंदिरात माघी गणपती उत्सव साजरा केला जात असतो.यामुळे दर वर्षी विविध माध्यमातून अन्न दान केले जाते यावर्षी कै.जगन्नाथ नामदेव पाटील यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर पाटील माध्यमातून महाप्रसाद देण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन रवि काठावले यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आयोजन संजय पाटील,विवेक सु.पाटील,ऱाजेश पाटील, प्रकाश पाटील,भरत ढवालकर,विशाल पाटील,लक्ष्मीकांत पाटील,अमोल पाटील,राम ढवालकर,रविंद्र पाटील, दिनेश पाटील, अदिच्या माध्यामातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याच बरोबर ग्रामस्थ मंडळ माजगांव यांचे सहकार्य लाभले.
Be First to Comment