रायगड शिव सम्राटचे 12 व्या वर्षात यशस्वी पदार्पण
सिटी बेल लाइव्ह । नवीन पनवेल ।
नवीन पनवेलमधील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवतेज मित्र मंडळाला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावर्षी शिवतेज मित्र मंडळाचा माघी गणेशोत्सवाचा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे हा वर्ष सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी ठरविले होते. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व शासनाच्या अटी, निर्बंधांचा विचार करुन यावर्षीचा माघी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे दरवर्षी होणारे महाप्रसाद, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भव्य विसर्जन मिरवणूक रद्द करण्याचे ठरविले.
शिवतेज मित्र मंडळाच्या माघी गणेशोत्सवास यावर्षी विशेष महत्त्व आहे, कारण यावर्षीचा गणेशोत्सव हा रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव आहे, त्याचबरोबर रायगड शिव सम्राटचा 11 वा वर्धापन दिन असल्याने हा दुग्धशर्करा योग तसेच शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांना यावर्षीचा पनवेल तालुका पत्रकार महासंघाचा अध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला असल्याने यावर्षीच्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावर्षी शिवतेज मित्र मंडळाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत छोटेखानी कार्यक्रम आयोजित केले होते. नवी मुंबईचे उप आयुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते कोरोना काळात कार्यरत असलेल्या डाॕ. श्यामली कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच रायगड शिव सम्राटच्या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
नवी मुंबई(परिमंडळ-2)चे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील यांच्या हस्ते नाशिक येथील आर.के. प्लॕनर्सचे संचालक रविंद्र पाटील व शिवतेज मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच सध्या सायबर क्राईमचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु असून अनेक लोक नोकरी निमित्ताने तर काही लोक पैसा दुप्पट करण्याच्या हव्याशापोटी फसत आहेत. त्यामुळे जनमाणसांत जनजागृती व्हावी, म्हणून कॕशलेस व्हा पण केअरलेस नको तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना व्हायरस…काळजी घ्या, सुरक्षित रहा, अशा विषयाचे भीत्तीपत्रक लावण्यात आले.
शिवतेजच्या माघी गणेशोत्सवाप्रसंगी नवी मुंबईचे पोलीस उप-आयुक्त शिवराज पाटील, नवी मुंबई परिमंडळ-2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक देविदास सोनावणे, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका वृषाली वाघमारे, नगरसेवक मनोज भुजबळ, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे जेष्ठ सल्लागार तथा दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर,सिटी बेल वृत्त समूहाचे समुह संपादक विवेक पाटील, मंदार दोंदे, अरविंद पोतदार, संजय कदम, दिपक घोसाळकर, गणेश कोळी, सुधीर पाटील, अनिल कुरघोडे, नितीन देशमुख, रफिक शेख यांच्यासह अनेक मान्यवरांनी दर्शन घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रेम कांबळे, उपाध्यक्ष विष्णू ठाकूर, सचिव नितीन रेवाळे, सल्लागार सुभाष वाघपंजे, संदेश पाटील, सुचित पाटील, समिर रेवाळे, प्रथमेश रेवाळे, शमेंद्र कोळंबेकर, विनायक अधिकारी, विनोद सावंत, नरेंद्र जाधव, अक्षय वर्तक, दिपक म्हात्रे, आकाश सावंत, काशिनाथ पाटील, पांडुरंग आमरे, संजय भोसले, सचिन चवरकर, नितीन सोनावणे, नियोजित पाटील, सुदेश पाटील, सर्वेश पाटील उपस्थित होते.
Be First to Comment