Press "Enter" to skip to content

पालीत माघी गणेशोत्सव साधेपणाने व नियमांचे पालन करून

अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वराच्या माघी गणेशोत्सवात पालीत भक्तिमळा फुलला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त व व्यवस्थापन

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत ।

महाराष्ट्रातील अष्टविनायक धार्मिक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात असलेल्या  पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानच्या माघी गणेशोत्सवात रायगड जिल्ह्यासह पनवेल, मुंबई , नवी मुंबई, ठाणे, उपनगर व अन्य शहरातून , तसेच ग्रामीण भागासह खेड्यापाड्यातून भाविक दर्शनासाठी आले होते.

बल्लाळेश्वर मंदिर परिसर भाविक भक्तांनी फुलून निघाला होता. कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासन नियम पालन करून माघी उत्सव अत्यंत शांततेत व साधेपणाने साजरा करण्यात आला. भाविकांनी पहाटेपासून बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पालीत जणूकाही भक्तिमळा फुलला होता.

उत्सवाच्या पाश्वभूमीवर पोलीस प्रशासन  व देवस्थान प्रशासनाने चोख बंदोबस्त केला आहे. भक्तिभावाने दूरवरून आलेल्या पालख्या देखील या उत्सवात आकर्षण ठरल्या. श्री गणेशाच्या गजराने वातावरण भक्तिमय व प्रफुल्लित झाले होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा उत्सवाला काही मर्यादा व बंधने आल्याने यात्रा आणि काही उपक्रम झाले नाहीत. कीर्तनाला देखील नेमकेच लोक उपस्थित होते. माघी महोत्सवानिमित्त प्रशासन व देवस्थान यांच्या समन्वयातून उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन करण्यात आले आहे. येणाऱ्या भाविक व भक्तगणांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्टने पुरेपूर खबरदारी घेत व्यवस्थापन केले आहे. महाप्रसाद झाला नाही तसेच पालखी देखील साधेपणाने काढण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.