सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।
श्री गणपती देवस्थान,मोठे नागाव,उरण यांच्या वतीने मंदिर अध्यक्ष श्री जयेंद्र नाईक,सचिव श्री शशिकांत पाटील आणि सहकारी जितेंद्र म्हात्रे, विकास माळी, सचिन म्हात्रे,रोशन म्हात्रे आणि रूपेश म्हात्रे,अमित नाईक, योगेश म्हात्रे, राजेंद्र माळी यांच्या सहकार्याने ११८व्या वर्षात प्रवेश करणा-या या मंडळाने पहिल्यांदाच साधेपणाने चार दिवसांचा उत्सव कोविड-१९ या प्रादुर्भावामुळे व शासनाच्या आदेशानुसार एकच दिवस साजरा केला.
सदर उत्सवात वैशिष्ट्य म्हणजे तीन दिवसांचे धार्मिक विधी श्री गणपती जन्म, महाप्रसाद आणि पालखी सोहळा दि.१५-०२-२०२१ या एकाच दिवशी कमीत-कमी भक्तजनांत साजरा केला.
वरील कार्यक्रमासाठी मा.आमदार मनोहर शेठ भोईर, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल भगत,नागांव म्हातावली ग्राम पंचायत सरपंच सौ.रंजना पाटील तसेच नवनिर्वाचित नागांव आणि म्हातावली ग्रामपंचायत सदस्य यांनी श्री गणपती दर्शनाचा लाभ घेतला.
Be First to Comment