यात्रा व विविध उपक्रम रद्द, कोरोनाचे नियमांचे पालन करून उत्सव होतोय साजरा
सिटी बेल लाइव्ह । सुधागड । धम्मशील सावंत ।
महाराष्ट्रातील अष्टविनायक देवस्थानांपैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानच्या माघी गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासन नियम व अटी शर्थीचे पालन करून उत्सव साजरा होत आहे. येत्या 15 फेब्रुवारीला होणारा माघी गणेशोत्सवाची सुरवात दि.(12)फेब्रुवारी पासून झाली आहे.
यंदा उत्सवाला काही मर्यादा व बंधने आल्याने यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत. माघी महोत्सवानिमित्त प्रशासन व देवस्थान यांच्या समन्वयातून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी महोत्सवात अलोट गर्दी लोटणार असल्याचा अंदाज घेऊन अचूक व पूर्वनियोजन केले जात आहे. तसेच बल्लाळेश्वर मंदिर परिसरात रोषणाई व सजावट केली आहे.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ऍड. धनंजय धारप म्हणाले की, यावर्षी माघी गणेशोत्सव 12 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून पुढे पाच दिवस कोरोनाचे नियम व अतिशर्थी पाळून चालणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा आणि धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. परिणामी उत्सवात यावर्षी यात्रेसाठी अथवा रस्त्यावर दुकाने लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. त्याचप्रमाणे जन्म सोहळ्याच्या कीर्तनास फक्त मोजके भाविक उपस्थित राहतील. यावर्षी श्री गणेशाची पालखी देखील कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने गाडीतून निघेल. तसेच पालखी रस्त्यात कोठेही थांबणार नसून लोकांनी पालखीस न ओवाळता फक्त नमस्कार करावे. तसेच भाविकांसाठी महाप्रसाद यावर्षी होणार नाही असे बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे सांगण्यात आले.
Be First to Comment