रसायनी युनिटच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी रसायनी कामगार सेना प्रयत्नशील
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
एच.आय.एल कंपनी रसायनी युनिटच्या परिस्थितीचा आढावा देण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्नांबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी व त्यांना मार्गी लावण्यासाठी एच.आय.एल रसायनी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांची भेट घेतली.
यावेळी कामगारांचे रखडलेले पी.एफ चे पैसे, निवृत्त कामगारांच्या उर्वरित रजांचे पैसे, ऍग्रीमेंट लवकरात लवकर करून घेणे, मागील एरियर्स पेमेंट त्वरित मिळणे, अनुकंपतत्वावर मुलांना कंपनीत लागू करून घेणे, सॅलरी डिडक्शन व इतर मुद्द्यांवर अधिक चर्चा करण्यात आली. या बैठकीत मांडण्यात आलेल्या मुद्द्यांना मार्गी लावण्यासाठी संघटनेतर्फे यशस्वी प्रयत्न करण्यात येतील, जेणेकरून कामगारांचे व कंपनीचे भविष्य उज्वल होईल असे माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसुळ यांनी यावेळी सांगितले.
याआधीही कंपनीला आर्थिक संकटातून तारले असताना कंपनीच्या भवितव्यासाठी 60 कोटी रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त करून दिला असल्याची जाणीव ठेवून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. केंद्रीय मंत्री तथा मा. केमिकल आणि फर्टिलायजर अध्यक्ष आनंदराव अडसुळ यांची भेट घेतली.
यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी रमेश पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष बी.एन. वरसोलकर आणि सहसचिव राहुल जाधव आदी उपस्थित होते.








Be First to Comment