श्री साई शक्ती महिला मंडळ नविन शेवे ते प्रति शिर्डी साई बाबा पदचरण रथ यात्रा संपन्न
सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।
उरण तालुक्यातील श्री साईशक्ती महीला मंडळ यांच्या वतीने दरवर्षी उरण ते शिरगाव येथील प्रति शिर्डी पायी पालखी दिंडी काढण्यात येते .मात्र आज देशावर असलेल्या कोरोनाच्या सावटा मुळे दिंडीचे खंड पडू नये यासाठी शासना च्या नियमांचे पाळन करुन या वर्षी फक्त बाबांची पालखी दिंडी ऐवजी बाबांच्या पादूका घेवून बाबांच्या पादुकांचे गुरुवारी
सकाळी : ६:३० वा ‘ नविन शेवा येथील राम मंदिरात काकड आरती व पूजन करुन बाबांचा पद चरण रथ प्रतीशिर्डी ला निघाला.


साई बाबांच्या या पादुकां चे जागो जागी स्वागत व दर्शन घेतले .8 वाजता जस खार येथील रत्नेश्वरी मंदिर .नंतर सोनारी येथील साई मंदिर .व गणेश मंदिर येथे दर्शन करुन जास ई येथे मनोहर पटिल यांच्या कुटुंबियां कडून रथाचे स्वागत करुन पादुकांचे दर्शन घेतले.या साई बाबा रथाचे गव्हाण फाटा येथे श्री साई देवस्थान वहाळ च्या वतीने बाबांच्या रथा जोरदार स्वागत करुन पादुकांचे दर्शन घेतले. बंबा वी पाडा येथे सागर मढ्वी यांच्या परिवारा तर्फे रथाचे स्वागत करण्यात आले .


पनवेल येथे दिघोडे येथील सुनिल पाटील यांच्या परिवारा तर्फे रथाचे स्वागत झाले.कालुन्द्रे येथील गणेश मंदिर येथे रथाचे कुंड़लिक जितेकर.गुरुनाथ घरत. सुनिल म्हस्कर गणेश घरत परिवाराने स्वागत करुन दर्शन घेतले.त्यां नंतर साइबाबां चा पदचरणरथ पलस्पा फाटा येथील साई मंदिरात आल्यावर बाबांची मध्यान्ह आरती झाली.अजिवली येथे रथाचे यशोदीप वजन काटा येथे परशुराम माळी यांच्या परिवारा तर्फे स्वागत झाले.
बाबांच्या पदचरण रथाचे कामशेत येथे आगमन झाल्यावर ज्ञानेश्वर माऊली.शिंदे यांच्या परिवारा तर्फे बबाबाई शिंदे.सौ. मिनल शिंदे .श्रद्धा शिंदे यानी स्वागत करुन दर्शन घेतले .तसेच यावेळी त्यांच्या परिवार तर्फे भोजन व्यवस्था करण्यात आली.


त्यानंतर संध्या काळी साई बाबांच्या आरती करिता बाबांचा पद चरण रथ प्रति शिर्डी येथे पोहचल्या वर साई संस्थान प्रतिशिर्डी देवस्थान तर्फे देवस्थान चे अध्यक्ष श्री प्रकाश देवळे व सचिव सौ. सपना लालचंदानी यानी पालखीचे जोरदार स्वागत केले.
यावेळी सौं.शालिनी ताई रामचंद्र घरत
(संचालिका)नविन शेवा
श्री हरेश्वर मोरेश्वर घरत (कार्याध्यक्ष)
श्री विजय कृष्णकांत पाटील
(अध्यक्ष)
श्री सुनील राघो पाटील (खजिनदार)
श्री दिलीप नागेश कडू
(प्रमुख सल्लागार) .रामदास बुवा म्हात्रे, हरेश्वर ठाकुर, राकेश मुगळे,विष्णू कदम.सिद्धाजी माने. अनिल देवकर, गणेश कपिले, अर्जुन दहीभाते, मच्छीन्द्र कापरे, रमेश फरताडे, बद्रीनारायन पाटील आदी सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Be First to Comment