Press "Enter" to skip to content

भगवंताच्या नामाहून जगात श्रेष्ठ काहीही नाही : सुरेश महाराज पालवणकर

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार तरवडे ।

पंढरपूरच्या वारीमध्ये एवढे सामर्थ्य आहे की,वारी करणारा वारकरी कधीही आजारी पडत नाही कारण वारक-यांच्या मुखामध्ये कायमच भगवंताचे नाम असते.म्हणूनच भगवंताच्या नामाहून श्रेष्ठ असे जगात काहीही नसल्याचे भक्तीमय मार्गदर्शन नामाची पुष्टी जोडताना ह.भ.प.सुरेशमहाराज पालवणकर , वरसे-रोहा यांनी आपल्या किर्तनरुपी सेवेप्रसंगी खांब येथे भाविकांना मार्गदर्शन करताना काढले.

तालूक्यातील सेवानिवृत्त वनाधिकारी तथा धानकान्हे गावचे प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शंकर धनावडे भाऊसाहेब यांच्या खांब येथील निवासस्थानी भगवतगीता महाग्रंथाची सांगता व प्रवचन, हरिपाठ, हळदीकुंकू व पूर्वजांचे स्मरण,महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुरेशमहाराज पालवणकर आपल्या किर्तन सेवेप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.यावेळी सर्वश्री ह.भ.प.मारूती महाराज,क्रुष्णा जाधव,टोंगळे गुरूजी,धोंडू कचरे, क्रुष्णाराम धनवी,रघुनाथ कोस्तेकर, गणेश जाधव,बाबू पेटकर, यशवंत माहित, पांडुरंग गोसावी,सखाराम कचरे,मारूती चितळकर,यशवंत माहित, नारायण लोखंडे,नरेश मुरकर, मोरैश्वर मरवडे,निलेश कचरे,नथुराम जाधव, सुदाम कचरे, विनायक गोसावी,रामदास नवघरे,महेश कचरे आदींसह मोठ्या संख्येने भाविक भक्त व भगिनी उपस्थित होत्या.

यावेळी पालवणकर यांनी पुढे भगवंताचे नामस्मरणाने सर्व पापांचे हरण होते.म्हणूनच आपापलीए कर्तव्यकर्म करीत असताना भगवंताचे नामस्मरण करावे.त्यामध्येच जीवनाचे कल्याण होत असल्याचे सांगतानाच जेथे भगवंताचे नामस्मरण चालते तेथे भगवान परमात्माचे वास्तव्य असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.