५१ बालकांना दिले पोलिओ डोस
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
रोहा तालुक्यातील नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणा-या ऐनघर ग्राम पंचायत हद्दीतिल बि.सि.जिंदाल रुग्णालयात झालेल्या पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
आरोग्य व कुंटुब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फंत संपुर्ण भारत देशामध्ये पोलिओवर मात करण्यासाठी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली. यामध्ये संपुर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यामध्ये देखील पल्स पोलिओ मोहिमेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणा-या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमधिल सुकेळी येथिल जिंदाल रुग्णालयातही कोरोनासंबधितचे सर्व नियमांचे पालन करित जिंदाल कंपनी, जिंदाल काँलनी येथील एकुण ५१ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. यावेळी सुकेळी परिसरातील आशा सेविका चितंनिका आमडोस्कर, अंगणवाडी सेविका शुभ्रा सुटे यांनी मेहनत घेतली.








Be First to Comment