Press "Enter" to skip to content

माथाडी कामगार सेना कार्यालयाचे शानदार उदघाट्न

माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी पेटून उठा : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले आदेश

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

नागोठणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना कार्यालयाची स्थापना झाली याचा मला मनापासून आनंद होत असून कामगार सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. या भागातील आदिवासी बांधवांची माथाडी कामगार सदस्य म्हणून नोंदणी केल्यामुळे त्यांना अनेक सोईंचा लाभ होणार असून महत्वाचे म्हणजे त्यांचा चार लाखांचा विमा काढण्यात आला आहे. या भागातील कंपन्यांमध्ये आपल्या माथाडी कामगारांना काम मिळालेच पाहिजे. कारखानदार आपल्या जमिनी घेतात आपल्या राज्यसरकाराकडून सवलत घेतात व परप्रांतीयांना नोकरी व ठेके देतात. आपल्या मराठी माणसाला शंभर टक्के काम मिळालेच पाहिजे. या कारखानदारांना “दे धाय, धरणी ठाय” करून सोडा. त्यांना अद्दल घडवा. राजसाहेब ठाकरे व मी तुमच्या पाठीशी आहे. तसेच माथाडी कामगाराच्या न्याय हक्कासाठी पेटून उठा असा आदेश महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नागोठणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना दिला.

नागोठणे येथील रामनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या कार्यालयाचे उदघाट्न बाळा नांदगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद गावडे, सरचिटणीस राजन शितोळे, मनसे जिल्हा प्रमुख संघटक गोवर्धन पोलसानी, जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सांगले, कामगार सेना जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, माजी आमदार प्रकाश भोईर, सुमंत तारी राजेश उजैनकर, महेश पंडित, सुबोध जाधव, विलास घोणे, सागर चाळसे, राजेश शाह, महेंद्र जाधव, वांगणी उपसरपंच रसिका तेलंग, कामगार सेना रोहा तालुका अध्यक्ष विनायक तेलंगे, उपाध्यक्ष गोरखनाथ पारंगे, विभाग अध्यक्ष नरेश भंडारी, मनसे विभागीय नेते हरिश्चंद्र तेलंगे, मोरेश्वर तेलंगे, रोहा तालुका चिटणीस प्रह्लाद पारंगे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, दिपश्री घासे, शीतल जगताप, नम्रता भिसे, स्वरा भंडारी आदींसह कार्यकर्ते व माथाडी कामगार उपस्थित होते. दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक तेलंगे, नरेश भंडारी व गोरखनाथ पारंगे यांनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.