सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी परीसरातील मोहोपाडा येथून संकष्टी चतुर्थी निमित्त हभप मारुती खाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा ते वरदविनायक महड पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या पायी दिंडीत श्री गणेश पालखी असल्याने ठिकठिकाणी पालखी थांबवून नागरिकांनी दर्शन घेतले.
या दिंडीत तरुणांची संख्या लक्षणीय होती.संकष्टी चतुर्थी निमित्त रसायनी परीसरातील वारकरी संप्रदायाने हभप मारुती खाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा येथील डोंगरी आलीतून पायी दिंडीला सुरुवात करण्यात आली.हि पायी दिंडी मोहोपाडा श्री गणेश मंदिराजवळ येताच हभप मारुती खाने यांच्याहस्ते मंदीरातील श्रीगणेशास पुष्पहार घालून पायी दिंडी मोहोपाडामार्गे पुढे निघाली.
यावेळी ठिकठिकाणी पालखी थांबवून नागरिक दर्शंन घेतानाचे दिसून आले. टालमृदुंगावर श्री गणेशाचा जयघोष करीत भगवा झेंडा फडकत दिंडी रस्त्याच्या एका बाजूने शिस्तबद्ध पद्धतीने वरदविनायक महडच्या दिशेने मार्गस्थ झाली.
Be First to Comment