Press "Enter" to skip to content

चिरनेर महागणपतीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चिरनेरच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. जवळपास दिवसभरात १५ ते २० हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचे समजते.

गणपती ही ज्ञान देवता म्हणून ओळखली जाते.महाराष्ट्रात गणेशाची अनेक पुरातन जागृत देवस्थाने आहेत.असेच एक पुरातन जागृत देवस्थान रायगड जिल्ह्यातील चिरनेर या ऐतिहासिक गावात आहे. रायगडातील उरण तालुक्यात असणारे चिरनेर हे गाव निसर्ग संपन्नतेची देणगी लाभलेले सुंदर गाव आहे.पूर्वीच्या काळी मुख्य बाजारपेठ असणारे चिरनेर गाव इंग्रज राजसत्तेविरुद्ध लढल्या गेलेल्या १९३० सालच्या जंगल सत्याग्रहाच्या लढ्याने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात प्रसिद्ध पावले आहे.मात्र चिरनेरची खरी ओळख आहे ती पुरातन,जागृत अशा महागणपती देवस्थाना मुळे !!

चिरनेर गावात असणारे अत्यंत प्राचीन महागणपती देवस्थान आता गणेश भक्तांची पंढरी झाली आहे. महागणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आपल्या इच्छापूर्तीचा अनुभव वेळोवेळी येत असल्याने या देवस्थानी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची नेहमी गर्दी असते.
अत्यंत प्राचीन असणाऱ्या या देवस्थानचा जीर्णोद्धार पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांनी केला आहे.पाषाणी,गोल घुमटाच्या भव्य मंदिरात महागणपती बाप्पा स्थानापन्न आहेत.मूर्ती पाषाणी,चतुर्भुज शेंदूरचर्चित असून पूर्वाभिमुख आहे.सुमारे सहा फूट उंच व साडेतीन फूट रुंद अशी भव्य असणारी मूर्ती पद्मासनात बसली असून गणरायाच्या हाती खड्ग व पाश आहेत.
नवसाला पावणारा गणपती म्हणून महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरली असल्याने हजारो गणेश भक्त देवदर्शनासाठी नेहमी आवर्जून येतात. त्याच्यासमोर नस्तमस्तक होण्यासाठी आज संकष्टी चतुर्थीच्यामुहूर्त दिनी गणेश भक्तांची अलोट गर्दी उसळली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.