सिटी बेल लाइव्ह । रोहा । नंदकुमार मरवडे/केशव म्हस्के ।
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी आज रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने रोहा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने रोहा पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहेत. त्या सोडविण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करुनही त्या सुटल्या नाहीत. त्यामध्ये २८ एप्रिल २०२० चा उत्पन्न व वसुलीची अट घालणारा शासन निर्णय रद्द करणे, १० ऑगस्ट २०२० च्या किमान वेतन शासन निर्णयाची शासन स्तरावरून अंमलबजावणी करणे, २० ऑगस्ट २०२० चा राहणीमान भत्ता कमी करणारा शासन निर्णय रद्द करणे आदी मागण्यांसाठी गुरुवार दिनांक. सकाळी ११ वाजल्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले होते.

यावेळी रोहा तालुका अध्यक्ष सुरेश शिर्के, उपाध्यक्ष शत्रुघ्न कामथेकर,सचिव शंकर कदम,अरुण मोरे,गणेश मोरे, आदी कमिटी सभासदांनी मार्गदर्शन केले, यानंतर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना सनदशीर व शांततेच्या मार्गाने निवेदन सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, महिला कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.








Be First to Comment