सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार)
आज सकाळ पासूनच पावसाने दमदार सुरुवात केल्याने पेण मध्ये काही भागात पाणी साठल्याने रस्ते पाण्याखाली आले होते.मुसळधार पावसामुळे पेण शहरात वाहनचालकांची तसेच खरेदी साठी आलेल्या नागरिकांची एकच धावपळ झाली होती तर रस्त्यावर पाणी आले होते. रेनकोट, छत्री घेऊन नागरिक पावसाच्या पाण्यातून मार्ग काढताना दिसून येत होते.जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले.पेण शहरातील खाटीक अळी जवळील मच्छी मार्केट तसेच विठ्ठल आळी,देव आळी आदी भागात पावसाचा जोर कमी होई पर्यंत पाणी साठले होते तर पाणी साठल्याने गटारामधील पाणी हि रस्त्यावर आले होते.या पाण्यातूनच नागरिक मार्ग काढताना दिसत होते तर कित्तेक वर्ष या भागात पाणी साठत असून अद्यापही हि समस्या कायमच असल्याचे स्थानिक नागरिकां कडून बोलण्यात येत आहे तर गटाराच्या पाण्यामुळे रोग राई पसरण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नसल्याने पेणमधील अशा समस्ये वर उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
Be First to Comment