कामगार नेते महेंद्र घरत यांच्या NMGKS संघटनेचा ऐतिहासिक पगारवाढीचा करार
सिटी बेल लाइव्ह । कामगार प्रतिनिधी ।
कामगार नेते महेंद्र घरत यांची न्यु मेरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटना कामगारांना नेहमीच सन्मानाने जिवन जगण्यासाठी न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. आरकेमा केमिकल नेरूळ, नवी मुंबई मधील कामगांरासाठी १ जानेवारी २०१९ पासुन प्रलंबित पगारावाढीचा करार आज संपन्न झाला. चार वर्षांसाठी रूपये २५४०० पगारवाढ, एक पगार बोनस व एक पगाराच्या ७०% ते ८० % प्रोडक्शन इंन्सेन्टीव्ह म्हणून देण्याचे या करारनाम्यानुसार मान्य करण्यात आले आहे.

न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी मध्यस्थीमुळे कोरोना काळात सुद्धा कंपनीने चांगले सहकार्य करून कोणतीही पगार कपात न करता सर्व सुविधा दिल्या तसेच पगार वाढीचा करार सुद्धा केला यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या करारावर न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पि.के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील, तर व्यवस्थापनातर्फे विवेक जगताप, विलास कुलकर्णी, विपूल सावंत तर कामगारांतर्फे नंदरकुमार पांचाळ, प्रविण सावंत, आमसीद घंटे, मनोहर उतेकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.








Be First to Comment