कॅमलीन कंपनीत महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या नामफलकाचे अनावरण
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
पातालगंगा अतिरीक्त एमआयडीसी चावणे येथील कॅमलीन कोकुयो या कंपनीतील कामगारांनी महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे नेतृत्व स्विकारले आहे.याकरीता महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष,कामगारनेते श्रीपाद (आप्पा) पराडकर यांच्या उपस्थितीत युनियन नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी मुजोर प्रशासनाला कामगारांवर होणा-या अन्यायाबाबत त्यांनी अंतिम इशारा दिला.यापुढे जर कामगारांवर अन्याय झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही असे श्रीपाद पराडकर यांनी ठणकावून सांगितले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस राजेश महाडिक,संयूक्त सरचिटणीस दशरथ धाडी.सरचिटणिस घनश्याम नाईक,रायगड जिल्हाध्यक्ष केवल माली,आनंद सकपाले, जनार्दन थोरवे आदी मान्यवरांसह हिंद भारतीय जनरल कामगार सेना,माथाडी जनरल कामगार उपस्थित होते.








Be First to Comment