सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
तुपगाव हद्दीत कोंबड्यांचे लसीकरण करण्यात आले. असून सुमारे २१९ कोंबड्यांना लस टोचण्यात आली.
तीन दिवसांपूर्वी तुपगाव येथे कोंबड्यांचा व चौक येथे कावळ्यांचा अचानकपणे मृत्यू झाला होता.याची दखल घेत पशुधन विकास अधिकारी डॉ.एम.एम.मर्चंडे यांनी तुपगाव येथे प्रत्यक्ष भेट दिली होती.
मृत कोंबड्यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल येण्यासाठी काही काळ जाईल,तोपर्यंत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले असल्याने कोंबड्यांचे लसीकरण करण्यात आले.

यासाठी तुपगाव परीसरातील कोंबड्यांना रानिकेत डिसिज ( आरडी ) नावाची लस कोंबड्यांच्या व्हायरल रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी देण्यात आली.तसेच परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मवर भेट दिली असून कुठेही बर्डफ्ल्यूची लक्षणे आढळून आली नसल्याचे डॉ.एम.एम.मर्चंडे यांनी बोलताना सांगितले. खवय्यांनी अंडी व चिकण खाण्यासाठी हरकत नसल्याचेही ते म्हणाले.तर चौक येथील कावळे ज्याठिकाणी मृत झाले त्या परिसरात उंदीर व घुशी यांना मारण्यासाठी टाकलेल्या विषारी औषधानेही झाला असावा असा अंदाज बांधून ज्याठिकाणी कावळे मरून पडले होते.तेथे अनेक प्रकारची घाण असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.








Be First to Comment