सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे बौध्दाचार्यं श्रामणेर प्रशिक्षण शिबीर मोहोपाडा रसायनी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनात पनवेल तालुका अध्यक्ष राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय सचिव एम.डी.सरोदे गुरुजी मार्गदर्शन करीत आहेत.
यावेळी राज्यभरातून उपस्थित राहिलेल्या भन्ते शिवली बोधी यांना शिबिरात प्रशिक्षण दिले जात आहे. यात एकूण चालीस प्रकारच्या विषयावर प्रशिक्षण दिले जाते.यात मानवाच्या कल्याण, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती,सदवर्तन आदी विषयांवर मार्गदर्शन सुरु आहे.तसेच या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरात शनिवार व रविवार दि.9 आणि 10 जानेवारी रोजी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी मेजर विजय कांबळे, महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष यांनी सखोल मार्गदर्शन केले.या शिबिरात प्रामुख्याने शारीरिक कवायत व मानसिक व्यायाम यामधून समतावादी समाजनिर्मांणतेचा पाया यावर मार्गदर्शन करण्यात आले.यावेली सहकार्य मेजर अनंता गायकवाड यांनी मार्गदर्शन करुन केले.मोहोपाडा रसायनी येथील बौध्दाचार्यं श्रामणेर प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष राम जाधव, सरचिटणीस राहुल कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश कलोते आदींच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.यासाठी भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारिणी व जिल्ह्यातील पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौध्दाचार्यं,श्रामणेर,समता सैनिक, उपासक,उपासिका परीश्रम घेत आहेत.
या प्रशिक्षण शिबिराची सांगता आद.भिमराव आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांच्या उपस्थितीत बुधवार दि.13 रोजी होणार आहे.
Be First to Comment