ह.भ.प अनिल महाराज सानप यांचे किर्तन संपन्न
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
ज्या परमेश्वराने हा देह दिला आहे. त्याचे नामस्मरण न करता तो आपण वाया घालवतो.परंतु अडचणी निर्माण झाल्यावर त्या परमेश्वराची आठवण पडते.त्यामुळे तो तुमच्या हाकेला कसा धाऊन येईल ? यामुळे परमेश्वराचे सतत नामस्मरण केले तर सर्व संकटे दूर होतील असे ह.भ.प. अनिल महाराज सानप यांनी गजानन ढोकरे यांची वास्तुशांती व ढोकरे भावकीची कुळदैवताची पूजा या निमित्ताने आयोजित किर्तन सेवेत व्यक्त केले.
पडतां जड भारी।दासी आठवावा हरी।।१।।मग तो होऊं नेदी सीण।आड घाली सुदर्शन।।धु।।नामाच्या चिंतने। बारा वाटा पळती विघ्ने।।२।। तुका म्हणे प्राण।करा देवासी अर्पण।।३।। या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या आधारे स्पष्ट करतांना ह.भ.प.अनिल महाराज सानप यांनी किर्तन सेवेत मत व्यक्त करतांना सांगितले कि कपटी शकुनी मामाच्या सारिपाटाच्या खेळात पांडवांचे राज्य गेले नंतर द्रोपदी पणाला लावली ती हि या खेळात शकुनी मामाच्या साथिने दुर्योधनाने जिंकल्यानंतर त्यांनी द्रोपदिला भर दरबारात फरफट आणुन लजास्पद कृत्य केले तिच्या साडीला हात घातला भर दरबारात अनेक सूरवीर होते तेही काही करू शकत नव्हते यावेळी द्रोपदिने देवाचा धावा केला व देवाने तिला या लजस्पद कृत्या पासून वाचविले कारण ती सतत देवाच्या नामस्मरण होती.
यावेळी गायनाचार्य ह.भ.प. अक्षय महाराज लोहगावकर,राजा म्हसकर, विणेकरी रामचंद्र अंब्रुस्कर,मृदूंगमणी विशाल ढोकरे, मोहन सानप,दगडू म्हसकर, किसन ढोकरे,सुजाता म्हसकर, यशवंत ढोकरे, व असंख्य महिला वर्ग, तरुण वर्ग,ग्रामस्थ उपस्थित होते.
Be First to Comment