सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
चौक आसरोटी गावी वै.ह.भ.प.गंगाबाई राघो ठोंबरे यांच्या उत्तरकार्य निमित्ताने प्रवचन रुपी सेवेत बोलताना महंत श्री आनंद महाराज खंडागळे बोलत होते. वारकरी संप्रदायाचा महामेरू म्हणून ओळख असलेले,आतापर्यंत जवळपास साडे नऊ हजार कीर्तने आणि हजारो प्रवचन करणारे, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक येथील नाथ आश्रमाचे संस्थापक महंत श्री आनंद महाराज खंडागळे आपल्या प्रवचनात सांगत होते की,ज्ञानेश्वरी मधील बाराव्या अध्यायातील सातव्या क्रमांकाच्या श्लोक मध्ये सांगितले आहे की,एकंदरीत नियतीचा नियम पाहिला तर प्रत्येक येणाऱ्या जीवाला मृत्यू अटळ आहे.तो अजूनपर्यंत कोणालाच चुकवता आला नाही.ज्याला जन्म आहे,त्याला मृत्यू आहे.एक मात्र नक्की ज्याचं जस कर्म असेल त्याप्रमाणे त्याला मृत्यू असतो.माणसाने जीवनामध्ये सदाचार सपतीने कर्म केलेले असेल तर त्याचा मृत्यू चांगला असतो,निषिद्ध कर्म केलेले असेल,अनैतिक कर्म केले असतील तर त्याचा मृत्यू त्यापद्धतीने येतो.
अंतकाळाच्या वेळेला त्याला यातना होत असतात आणि केलेल्या कर्माची संपूर्ण कॅसेट अंतकाळाच्या वेळेला त्याच्या डोळ्यासमोर उभी राहते.म्हणून भगवंताने अठराव्या अध्यायात संदेश दिला आहे,म्हणून आपले कर्म नेहमी चांगले ठेवा.
प्रत्येक जीव कर्माच्या जाळ्यात बांधला आहे.जस भोगजन्य प्रारब्ध असेल त्याप्रमाणे त्याला भोगावे लागते.तरीसुद्धा कर्माच्या बाबतीत जर कर्म करायचं झालं तर चांगले कर्म करा.नको ते उपद्व्याप करण्यापेक्षा जर चांगले कर्म केले तर त्याचा मृत्यू चांगला होतो.
ज्या मातोश्रीच्या उत्तरकार्य निमित्ताने आपलं प्रवचन करतो आहे,त्यांची एक इच्छा होती, मरणं तर येणारचं आहे त्याबद्दल वाद नाही. पण अंथरुणात खितपत पडून,लोळत पडून असा अंतकाळ मला नको अशी त्यांची धारणा होती आणि नेमकं तसंच घडलं.अचानक चक्कर येते काय, त्याच्यामध्ये अंतकाळ होतो काय. आपण भगवंताची प्रार्थना ज्या परिस्थितीत करू,भगवान आपली प्रार्थना ऐकतात,पण ती भगवंताची प्रार्थना करताना त्यांच्यामध्ये निष्कामता असली पाहिजे,ती प्रार्थना करताना त्याच्यामध्ये दृढ विश्वास पाहिजे.जर दृढ विश्वास असेल,निष्कामता असेल तर भगवान आपली प्रार्थना ऐकतात. त्यालाही कान आहेत,त्यालाही डोळे आहेत.भगवान परमात्मा आपल्या भक्तांशी सुखसवांद करतात.ज्याने निष्ठेने भक्ती केली त्याच मात्र भगवान परमात्मा ऐकल्याशिवाय राहत नाही.
आपला विषय एवढ्यासाठीच चालला आहे,ह.भ.प.गंगाबाई राघो ठोंबरे या मातोश्री चा स्वभाव अंत्यत मनमिळाऊ होता.गावामध्ये कधीच उभ्या आयुष्यात कधी कोणाशी भांडल्या नाहीत,वारकरी संप्रदायाची पेटती मशाल होती. परमेश्वरावर दृढ विश्वास होता म्हणून त्यांना उत्तम मरणं आलं, याला साधुकत्वचे मरणं म्हणतात.म्हणून नेहमी भगवंताशी एकनिष्ठ रहा,नामस्मरणात रहा असं प्रवचन रुपी सेवेत ते बोलत होते.यावेळी वारकरी संप्रदायाची मंडळी,तरुण वर्ग,ग्रामस्थ,महिला उपस्थित होत्या.
Be First to Comment