हरवलेले क्षण
हरवलेल्या त्या क्षाणांना शोधते मी
विखुरलेल्या आठवांना सांधते मी
माळराणी एक कलिका उमलली
हर्षमोदे तृणपात्यासवे डोलते मी
प्रभातीला विहंग गातो हा भूपाळी
रविकिरणांचे दारी तोरण बांधते मी
शब्दीलस्पर्शा बावरी कशी भाळली
पैलथडीच्या त्या खुणा का शोधते मी
भावनांचा हा कसा दुष्काळ पडला
दानपात्रा घेऊन हाती चालते मी
वेदनांनी गात्र आता शिथील झाले
सूर वेणूचे पुन्हा का आळविते मी
सुमिता सबनीस,
सेलू (परभणी )








Be First to Comment