हे डिसेंबरा
सोबतीला आणतोस
गार झोंबणारा वारा
कडकडा वाजे थंडी
जगा सोसवेना मारा
येशी वर्ष सरताना
दाटे मनात काहूर
काय गेले ? कसे गेले?
वाटू लागे हुरहूर
कोणी जगास सोडले
कोण दूर देशी गेले
किती ढाळली आसवे
किती दुःख सोसलेले
सारे सारे आठवे हे
जीव होई कासाविस
तरी उद्याच्या सुखाची
आस लागली मनास
जाता जाताना ने सारे
दुःख आणिक संकट
दुवा देईल जग हे
बघे नव्याची ही वाट
तुला देताना निरोप
दिसे आशेचा किरण
नव वर्षाच्या स्वागता
येई आनंदा उधाण
डॉ. समिधा गांधी, पनवेल







Be First to Comment