गावातील कामगार कामावर घेत नसल्याने माजी आमदार सुरेश लाड यांचा आरोप
सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
आलाना कंपनी सुरू झाली तेव्हा व्यवस्थाप आणि ग्रामस्थ यांच्यात संवाद घडून तातडीने दहा कामगार कामावर घेत उर्वरीत कामागार टप्प्याटप्याने घेण्याचे ठरले मात्र ते दहा कामागारांना एक गोडाऊनमध्ये डांबून ठेवले असून त्यांना कोणतेही काम दिले जात नाही,त्यामुळे या कंपनीत सोनं,गांजासह असं काय चुकीच्या उत्पादनाची तस्करी तर केली जात नाही ना ? म्हणून गावातील कामगार घेत नाही अशी शंका सर्वाच्या मनात असून उद्योग आणि पर्यावरण विभागाने याची तपासणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तसेच मा.आ.सुरेश लाड यांनी करीत कंपनी व्यवस्थापक मग्रूर आहेत त्यांना वाटतंय सर्वांना खिशात घालू हा त्यांचा भ्रम असल्याचा माध्यामांशी बोलताना सांगितले.
आलाना फ्रिगोरी फिको ही खाद्यतेल करणारी कंपनी आहे. २०१४ मध्ये स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण केल्यानंतर २० स्थानिकांना नोकरी देण्याचे आश्वासन देवून १० स्थानिक तरुणांना कंपनीने नोकरीत सामावून घेतले होते. उर्वरीत १० स्थानिकांना सहा वर्षानंतरही नोकरी न दिल्याने या १० जणांना नोकरी देण्याची स्थानिकांची मागणी आहे.

स्थानिकांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून साजगांव ग्रामस्थ आणि आलाना कंपनीचे व्यवस्थापन सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. ग्रामस्थ आणि व्यवस्थापनामध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अलिबाग येथे बैठक बोलावली होती.दरम्यान पुरवठा आधिकारी मधुकर बेडके यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत थारूमाथूर उत्तरे देवू वेळकाडूपणा करीत व्यवस्थापनाने आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने या बैठकीत कोणताही मार्ग निघाला नाही.शेवटी अंतिम चर्चा खालापूर पोलिस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांच्या कार्यालय झाली असता व्यवस्थापनाच्या हुकूमशाहीमुळे सुवर्णमध्य न निघाल्याने दि.१६ डिसेंबर पासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर साखली उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मा.आ.सुरेश लाड यांनी उपोषणस्थळी भेट घेवून दूरध्वनीकरून व्यवस्थापकांना चांगले धारेवर धरले.यावेळी माध्यमांशी बोलतात लाड म्हणाले की, कंपनी २०१४ ला सुरू झाला तेव्हा आंदोलन केल्यानंतर ५० कामगार कामगार घेण्याचे मान्य करीत १० कामगार तातडीने कामावर घेण्याचे मान्य करीत उर्वरीत कामगार टप्प्याटप्याने घेणार असल्याचे अश्वासन दिले आपणही मान्य केले.मात्र जे दहा कामगार कामावर घेतले त्यांच्या हाताला कोणतेही काम न देता एका गोडाऊन डांबून ठेवत ड्यूटी संपल्यावर घरी सोडले जाते.गावावर इतका राग आहे किंवा आम्ही मध्यस्थी केली म्हणून काम दिले जात नाही त्याहीपलिकडे आमच्या मनात शंका आहे की कंपनीत सोनं,गांजासह असं काय चुकीच्या उत्पादनाची तस्करी तर केली जात नाही ? ते गावातील कामगार बाहेर वाच्यता करतील ,बाहेरील कामगार व्यवस्थापनाच्या दबावाखाली राहतील.त्यामुळे नक्की कंपनीत काय बनतंय याची चौकशी उद्योग आणि पर्यावरण विभागाने करण्याची मागणी करीत स्थानिकांनी नोकरीत सामावून घेतले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा लाड यांनी दिला आहे.








Be First to Comment