Press "Enter" to skip to content

तो आणि पाऊस

तो आणि पाऊस

तो आणि पाऊस, सारखेच दोन्ही
सुखावती ओलेचिंब करती तनीमनी!
मृदूगंध दरवळे
श्र्वासांश्वासातूनी
आनंद त्या तृप्तीचा जाई सुखावूनी!

तो आणि पाऊस सारखेच दोन्ही
कोसळती घन बिलगूनी
व्याकूळ जैसी धरणी, आगंतुक आस येती उचंबळूनी!

तो आणि पाऊस सारखेच दोन्ही
सखा घनघोर कान्हा सावळाच
मी मेघा टपोरी,तेही सावळे सावळेच,
येई सर सर संततधार
त्याने होई मन अंगार!

तो आणि पाऊस सारखेच दोन्ही
गार शिडकावा,मंद हवा
कोसळता होई ,प्रीतीची उधळण, आलिंगन होता साजनाचे,पेटे वणवा मनी!

तो आणि पाऊस सारखेच दोन्ही
अंतरी तो विलीन होता,प्रीत नशीली होई,
ओथंबून वाहे तनमन
मिलनाच्या ओढीने!
होता मिलन गात्र सारी
शितल जाहली त्या अनामिक तृप्तीनी!
तो आणि पाऊस सारखेच दोन्ही पूर्णिमा शिंदे

आकाशवाणी निवेदिका, मुंबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.