आठ वर्षीय बालक पडला गटारात गंभीर जखमी : सतर्कतेमुळे प्राण वाचले
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
मुबंई गोवा महामार्गाच्या ठेकेदारांच्या कामांची दिरंगाई दिवसंदिवस नागरिकांच्या जीवावर वेतली असून मार्गावर असलेल्या कोलाड नाक्यावरील गटार लाईनचे काम मागील दीड ते दोन वर्षांपासून धीम्या गतीत सुरू असून काही गटारे उघडी अवस्थेत आहेत अनेकदा वृत्तपत्रातून आपघातांचा भाकीत व्यक्त केले होते मात्र ते आज सत्यात उतरत एक आठ वर्षाचा निष्पाप बालक या गटारात पडून गंभीर जखमी झाला परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे या बालकाचे प्राण वाचले आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाका हा कोकणचा केंद्र बिंदू समजला जातो अनेक वर्षांच्या परंपरेची बाजापेठ म्हणून या नाक्याची वेगळी ओळख आहे आता कोलाड आंबेवाडी चौक हा सुशोभीकरनाच्या मार्गावर आहे काही ठिकाणी सुशोभीकरण झाले आहे परंतु कायम स्वरूपी विकास कामांपासून वंचित राहिलेला नाक्यावर विकसित होत असलेल्या अर्धवट कामांमुळे आता नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे या अर्धवट कामांमुळे आपघातांचा धोका वाढण्याची शक्यता असे अनेकदा माध्यमातून भाकीत केले तरी देखील संबंधित खाते आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षतेमुळे व डोळेझाकीमुळे नाहक एका बालकाचे प्राण गेले असते सुदैवाने नागरीकांच्या सतर्कतेमुळे या बालकाचे प्राण वाचले मात्र बालक गंभीर जखमी झाल्याचे संकेत मिळत आहेत.
सदरील या गटार लाईनच्या दोन्ही बाजुला किराणा स्टोअर्स, स्वीट मार्ट,पेपर एजन्सी,पान शॉप, कापड दुकान,मोबाईल शॉपी,हार्डवेअर ,ज्वलर्स, फोटो ग्राफर्स,मटण शॉपी, दवाखाने, मेडिकल,बँका, पुस्तके विक्रेते,फळ विक्रेते व इतर विविध प्रकारची दुकाने आहेत. यामुळे विविध प्रकारच्या वस्तु खरेदीसाठी असंख्य नागरिक ये जा करीत असतात शिवाय या गटाराच्या लाईनवर झाकन न बसवल्यामूळे याला पर्याय म्हणून काही ठिकाणी फळ्या टाकल्या आहेत.
या फळीवरुन एक ग्राहक जात असतांना फळी मोडली.परंतुु दैव बलवत्तर म्हणून ग्राहक थोडक्यात बचावला.त्याला किरकोळ इजा देखील झाली तसेच काही गटरांवरील लोखंडी सल्या बाहेर आल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली आठ ते दहा वर्षापासून सुरू असून या कामात कोणतीही गती नाही शिवाय ठिक ठिकाणी कामे सुरू केली आहेत. आंबेवाडी कोलाड नाक्यावरील गटारे सध्यास्थितीत ही कामे अर्धवट असलेली दिसून येत आहेत.परंतु यामुळे कोणाचा नाहक बली गेला तर याला जबाबदार कोण? तसेच आंबेवाडी कोलाड नाका येथे गटार लाईनवर काही ठिकाणी झाकण बसवली गेली नसल्याने आपघातांचा धोका वाढला आहे एक आठ वर्षीय बालक सदरील गटारमध्ये पडला नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले मात्र गंभीर जखमी झाला आहे.
एक ना अनेकदा असे वेळोवेळी प्रकार घडत आहेत मात्र कामाची दिरंगाई कोणाचे तरी जीव गेल्यावर यावर उपाय योजना तातडीने केल्या जातील का .असा सवाल जेष्ठ शिवसैनिक भाऊ भगत यांनी केला आहे तसेच लवकरात लवकर यावर झाकण बसवण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे .








Be First to Comment